“हिंद-दी-चादर” या शताब्दी समागम कार्यक्रमासाठी जाणाऱ्या बसचे प्रस्थान पूजन जिल्हा परिषद सदस्या सौ. संस्कृतीताई सातपुते यांच्या शुभहस्ते…

माळशिरस (बारामती झटका)
धर्म जागरण, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने “हिंद-दी-चादर” या धर्मरक्षक श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समागम कार्यक्रमासाठी खारघर येथे जाणाऱ्या भाविकांच्या बसचे आज शनिवार दि. 28/02/2026 रोजी प्रस्थान पूजन दहिगाव जिल्हा परिषद गटाच्या नवनिर्वाचित सदस्या सौ. संस्कृतीताई राम सातपुते यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

शीख इतिहासातील अद्वितीय त्याग, धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान आणि आपल्या गौरवशाली सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणाऱ्या तसेच प्रत्येकाच्या मनात अभिमानासह आध्यात्मिक शांततेची अनुभूती निर्माण करणारा हा कार्यक्रम खारघर, मुंबई येथे पार पडत आहे.
श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून प्रेरणा घेत, समाजात एकता, सहिष्णुता आणि धर्मनिष्ठा जपण्याचा संकल्प अधिक दृढ करण्यासाठी हा समागम निश्चितच मार्गदर्शक ठरेल. तसेच त्यांच्या अमर गाथा, त्यांचे उच्च आदर्श आणि मूल्ये जाणून घेण्याची ही सुवर्णसंधी यानिमित्ताने महाराष्ट्रातील नागरिकांना अनुभवता येणार आहे. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तथा भाविक भक्त उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



